हा टोचतो मनाला घडला प्रकार आहे

हा टोचतो मनाला घडला प्रकार आहे.
केला तिनेच माझ्या छातीत वार आहे.

गेली बघून मजला आहे अशीच वरवर
ना पाहिली जखम ती जी आरपार आहे.

पाऊस हा अवेळी पडला तिच्या घनांचा
गेला गळून माझा मातीत बार आहे.

जातो न मी कधीही रे प्यावयास दारू
मज झिंगण्या सखीची ती याद फार आहे.

घेऊन जीव माझा भरलेच पोट नाही
मज वाटते सखे गं तू सावकार आहे.

असता खुलेच माझे घर रोज हे मनाचे
ती ठोठवीत बसली भलतेच दार आहे.

– प्रवीण सोमासे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Google+
http://swargvibha.in/onlinemagazine/2018/09/13/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE">
Twitter
LinkedIn